पुणे
Pune Unseasonal Rain : पुण्यात मुसळधार पावसाचा अंदाज; पुढील 4 दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
पुणे जिल्ह्यात पुढील 4 दिवस वादळी वारा आणि जोरदार पावसाची शक्यता.
पुणे जिल्ह्यात पुढील 4 दिवस मेघगर्जनेसह वादळी वारा आणि जोरदार पावसाची शक्यता लावण्यात येत आहे. तर राज्यातील कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील तीन दिवस तर विदर्भात पाच दिवस मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस असणार अशी शक्यता आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातही पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचे असून, शहर आणि घाट विभागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा पुणे वेधशाळेचा अंदाज लावण्यात येत आहे.