Pune Breaking
Pune Breaking

Pune Breaking : शंकर महाराज अंगात येतात सांगत पुण्यातील कुटुंबाची 14 कोटी रूपयांची फसवणूक; नेमकं प्रकरण काय?

कौटुंबिक अडचणी दूर होतील या भूलथापाला बळी पडून कुटुंबाने 14 कोटी रुपये गमावले
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • पुण्यातील कुटुंबाची 14 कोटी रुपयांची फसवणूक

  • शंकर महाराज अंगात येतात सांगत पुण्यातील कुटुंबाची फसवणूक

  • कौटुंबिक अडचणी दूर होतील या भूलथापाला बळी पडून कुटुंबाने 14 कोटी रुपये गमावले

(Pune Breaking) पुण्यातील कुटुंबाची 14 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यात कोथरुड परिसरातील एका कुटुंबाची मोठी फसवणूक झाल्याचे समोर आलं आहे. अंगात शंकर महाराज येतात, अशी बतावणी करून या दाम्पत्याला लुटलं आहे. शंकर महाराज अंगात येतात असे भासवून पुण्यातील कुटुंबाची 14 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली असून कौटुंबिक अडचणी दूर होतील या भूलथापाला बळी पडून कुटुंबाने 14 कोटी रुपये गमावले आहेत. या प्रकरणी पीडित कुटुंबियांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र लिहिले आहे. या पत्रानुसार माहिती मिळत आहे की, त्या दांपत्याच्या दोन्ही मुली आजारी असतात. एका कार्यक्रमासाठी ते गेले असता त्यांची ओळख दीपक जनार्दन खडके या व्यक्तीशी झाली.

या दांपत्याच्या मुलींबाबत खडके यांना कळल्यानंतर त्याने त्यांची ओळख वेदिका कुणाल पंढरपूरकर व कुणाल पंढरपूरकर यांच्याशी करून दिली. यावेळी त्यांनी वेदिका शंकर बाबाची लेक असून वेदिका च्या अंगात शंकर बाबा येतात ते तुमचे सर्व काम करून देतील तुमच्या मुलींचे आजार ठीक करतील असे सांगितले.

त्यानंतर त्या दांपत्याने वेदिका कुणाल पंढरपूरकर व कुणाल पंढरपूरकर यांची भेट घेतली. तेव्हा त्या वेदीकाने त्यांना अंगात शंकर बाबा आल्याचं सांगितलं व स्वतः शंकर बाबा बोलत असल्याबाबत भासवलं असून त्यांच्याकडे असलेली सर्व रक्कम माझ्याकडे द्या आणि मुलीचा आजार गंभीर असून दोष जास्त आहेत त्यामुळे आजार बरा होण्यास कालावधी लागेल असं सांगितले आणि करोडे रुपये घेतलं. या दांपत्याने परदेशातील घर सुद्धा विकलं आणि त्याचे पैसे या महिलेला दिले. मात्र एवढे सगळे करून देखील आपल्या मुली बऱ्या होत नसून गेल्या 3 र्षांपासून सुरू असलेल्या या गोष्टी फसवणुकीचा हा प्रकार असल्याचे लक्षात येताच या दांपत्याने पोलिसांकडे धाव घेतली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com