Pune Crime : पुण्यात चाललंय तरी काय? खाजगी क्लासमध्ये लहान मुलांचे गँगवार; शिक्षक शिकवत असतानाच मुलावर चाकू हल्ला
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pune Crime) राजगुरुनगर येथे भल्या सकाळी खाजगी क्लासमध्ये लहान मुलांचे गँगवार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. क्लासमध्येच मुलावर चाकू हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
शिक्षक शिकवत असतानाच मुलावर चाकू हल्ला करण्यात आला असून हल्ला करणारा विद्यार्थी दुचाकीवरुन फरार झाल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्याचे कारण मात्र अस्पष्ट असून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
आता खाजगी क्लासमधील मुलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. घटनेची माहिती मिळताच राजगुरुनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु करण्यात आला आहे.
Summery
राजगुरुनगर येथे भल्या सकाळी खाजगी क्लासमध्ये लहान मुलांचे गँगवार
शिक्षक शिकवत असतानाच चाकू हल्ला
हल्ला करणारा विद्यार्थी दुचाकीवरुन फरार
