Pune Metro
Pune Metro

Pune Metro : पुणे मेट्रोचा 'वन पुणे विद्यार्थी पास' आता मोफत

पुणे मेट्रोने विद्यार्थ्यांसाठी खास सवलतीची योजना सुरू केली
Published by :
Team Lokshahi
Published on

(Pune Metro) पुणे मेट्रोने विद्यार्थ्यांसाठी खास सवलतीची योजना सुरू केली असून, 25 जुलै ते 15 सप्टेंबर 2025 या कालावधीत 'वन पुणे स्टुडंट पास कार्ड' मोफत दिले जाणार आहे. नव्या शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सार्वजनिक वाहतूक स्वीकारण्यास प्रोत्साहित करण्याचा हेतू या योजनेमागे आहे.

सामान्यतः ₹118 किमतीचे हे कार्ड आता निशुल्क मिळणार असून, कार्ड काढताना किमान ₹200 चा टॉप-अप आवश्यक आहे. विशेष म्हणजे, हे संपूर्ण रक्कम कार्डवर शिल्लक म्हणून मिळेल आणि कोणताही अतिरिक्त शुल्क आकारला जाणार नाही.

ही सुविधा पदवीपर्यंत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी कार्ड पालकांच्या किंवा संरक्षकाच्या नावावर जारी केले जाईल, वैध KYC कागदपत्रांच्या आधारे. या कार्डद्वारे पुणे मेट्रोच्या सर्व प्रवासांवर 30% पर्यंत तिकीट सवलत मिळणार आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांचा रोजचा प्रवास अधिक परवडणारा ठरेल. पुणे मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून यामधील 29 स्थानके प्रवासी सेवेत दाखल झाली आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com