Pune News : पुण्यात मद्यधुंद चालकाच्या कारने 12 जणांना उडवलं, आरोपींवर गुन्हा दाखल

Pune News : पुण्यात मद्यधुंद चालकाच्या कारने 12 जणांना उडवलं, आरोपींवर गुन्हा दाखल

सदाशिव पेठेत अपघात: मद्यधुंद चालकाच्या कारने विद्यार्थ्यांना धडक दिली
Published by :
Shamal Sawant
Published on

विद्येचे माहेरघर पुणे येथून महत्त्वाची बातमी हाती आली आहे. पुण्यातील सदाशिव पेठेत एका चारचाकी गाडीने 12 जणांना उडवल्याची घटना घडली आहे. भावे हायस्कूलजवळ कारने 12 जणांना उडवल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात एमपीएससीचे विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. टपरीवर चहा पिण्यासाठी विद्यार्थी गेले होते. यावेळी एका कारने सर्वांना धडक दिली. या अपघातात 12 विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना संचेती आणि मोडक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, सायंकाळी 5.45 च्या सुमारास भवानी पेठेतील भावे शाळेजवळ चहाच्या दुकानाजवळ एक घटना घडली आहे. एका पर्यटक टॅक्सी चालकाने, जो कदाचित मद्यधुंद अवस्थेत होता आणि त्याच्या सहप्रवाशासह, गाडीवरील नियंत्रण गमावले आणि टी स्टॉलजवळ उभ्या असलेल्या लोकांवर आणि त्यांच्या पार्क केलेल्या वाहनांवर धडक दिली. जखमींना आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच या अपघातामध्ये कोणतीही जीवित हानी न झाल्याचेदेखील समोर आले आहे.

या अपघाताप्रकरणी आरोपी चालक जयराम मुले, वाहनाचा मालक दिगंबर यादव शिंदे, वाहनातील प्रवासी राहुल गोसावी यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास आता पोलिस करत असल्याची माहिती समोर आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com