Pune Traffic : अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त पुण्यात वाहतुकीत बदल; नागरिकांनी 'या' पर्यायी मार्गांचा वापर करावा
(Pune Traffic) अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त पुण्यातील काही मुख्य मार्गांवर वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. पुणे पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. टिळक रस्त्यावरील पूरम चौकातून बाजीराव रोड मार्गे शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांनी टिळक रोड – अलका चित्रपटगृह – डेक्कन जिमखाना या मार्गाने पुढे जावे, असे निर्देश दिले आहेत.
तसेच, छत्रपती शिवाजी महाराज रोडने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी स. गो. बर्वे चौक (मॉडर्न कॅफे) – जंगली महाराज रोड – झाशीची राणी चौक – खंडुजीबाबा चौक – टिळक रोड असा पर्यायी मार्ग वापरावा. अप्पा बळवंत चौकातून हुतात्मा चौकाकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असून, संबंधित रस्ता सरळ सोडण्यात येणार आहे.
काही दिवसांवर येणाऱ्या गणेशोत्सव काळात देखील शहरातील अनेक रस्त्यांवर एकेरी वाहतुकीची अंमलबजावणी केली जाते आणि मार्ग बदल होतात. त्यामुळे पुणेकरांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.