Pune Water Supply : पुणेकरांनो, पाणी जपून वापरा!  'या' भागातील पाणीपुरवठा आज राहणार बंद

Pune Water Supply : पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! 'या' भागातील पाणीपुरवठा आज राहणार बंद

पुणे शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

(Pune Water Supply) पुणे शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 17 जुलै रोजी (गुरुवार) पर्वती, चांदणी चौक आणि वारजे येथील जलशुद्धीकरण केंद्रांमधील पाईपलाईन व दुरुस्तीच्या कामांमुळे शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे.

महापालिकेच्या पाणी विभागाने कळविल्यानुसार, दुरुस्तीच्या कामांनंतर 18 जुलै रोजी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होईल. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पर्वती, वारजे, चांदणी चौक, कर्वेनगर, गांधी भवन, पॅन कार्ड क्लब बाणेर,चतुःश्रृंगी टाकी परीसर, पाषाण, या सर्व ठिकाणी पूर्ण दिवस पाणी कपात करण्यात येणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com