Ravindra Dhangekar : जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी रविंद्र धंगेकर पोलीस ठाण्यात
थोडक्यात
पुण्यातील जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरण
तक्रार दाखल करण्यासाठी शिवसेना नेते रविंद्र धंगेकर दाखल
पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करावी रविंद्र धंगेकरांची मागणी
(Ravindra Dhangekar) पुण्यातील जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी शिवसेना नेते रविंद्र धंगेकर दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. आज रविंद्र धंगेकर यांनी हा इशारा दिली होता आणि आता रविंद्र धंगेकर पोलीस ठाण्यात पोहचले असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आज पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन प्रकरणावर महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे.
चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात शिवसेना नेते रविंद्र धंगेकर दाखल झाले असून जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणात धंगेकर हे सातत्याने आवाज उठवत असताना पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी जो जमीन व्यवहार खरेदीचा जो प्रकार झालेला आहे. तो गैरमार्गाने झाल्याचा आरोप रविंद्र धंगेकर यांचा आहे. याप्रकरणी आता ते तक्रार दाखल करणार आहेत. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करावी ही मागणी धंगेकर करणार आहेत.
