Parth Pawar
Parth Pawar

Parth Pawar : पुण्यातील पार्थ पवार जमीन गैरव्यवहार संदर्भात आज अहवाल येणार; नोंदणी आणि मुद्रांकन महानिरीक्षकांना अहवाल सादर करणार

पार्थ पवार यांच्या कोरेगाव पार्कमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Parth Pawar) पार्थ पवार यांच्या कोरेगाव पार्कमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया इंटरप्राइजेस कंपनीने 1800 कोटी रुपये किंमत असलेली जमीन फक्त 300 कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यावर अनेक खुलासे समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता पुण्यातील पार्थ पवार जमीन गैरव्यवहार संदर्भात आज अहवाल येणार आहे.

आज नोंदणी महानिरीक्षक कार्यालयात हा अहवाल प्रत्यक्ष सादर करण्यात येणार असून सह नोंदणी महानिरीक्षक आणि चौकशी समिती अध्यक्ष राजेंद्र मुठे हा अहवाल सादर करणार आहेत. या अहवालात गैरव्यवहार संदर्भातील तथ्य मांडण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.

Summery

  • पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार संदर्भातील मुठे समितीचा अहवाल काल तयार करण्यात आला

  • आज नोंदणी महानिरीक्षक कार्यालयात हा अहवाल प्रत्यक्ष सादर करण्यात येणार

  • सह नोंदणी महानिरीक्षक आणि चौकशी समिती अध्यक्ष राजेंद्र मुठे हा अहवाल थेट सादर करणार

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com