Pune Sarasbagh Padwa Pahat
पुणे
Pune Sarasbagh Padwa Pahat : पुण्यातील सारसबागेत दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रम; सारसबागेबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
पोलिसांच्या परवानगीने दिवाळी पहाट कार्यक्रम
थोडक्यात
पुण्यातील सारसबागेत दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रम
कार्यक्रमाला हिंदुत्ववादी संघटनांनी केला होता विरोध
पोलिसांच्या परवानगीने दिवाळी पहाट कार्यक्रम
(Pune Sarasbagh Padwa Pahat ) दिवाळीला सुरूवात झाली असून आज दिवाळी पाडवा आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील सारसबागेत दिवाळी पहाट पाडवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सारसबागेत होणाऱ्या पाडवा पहाट कार्यक्रमाला काही हिंदुत्ववादी संघटनांकडून विरोध करण्यात आला होता. त्यानंतर हा कार्यक्रम रद्द करण्याचा आयोजकांनी निर्णय घेतला होता. मात्र आता पोलिसांच्या परवानगीने सारसबागेत दिवाळी पहाट कार्यक्रम पार पडत आहे.
याच पार्श्वभूमीवर सारसबागेच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
