Pune Crime
पुणे
Pune Crime : पुणे पुन्हा हादरलं, उच्चभ्रू सोसायटीत तरुणीवर अत्याचार
पुणे पुन्हा अत्याचाराच्या घटनेने हादरलं आहे.
(Pune Crime ) पुणे पुन्हा अत्याचाराच्या घटनेने हादरलं आहे. कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीत तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या 25 वर्षीय महिलेच्या तोंडावर स्प्रे मारून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
घटनेनंतर आरोपीने तिच्याच मोबाईलमध्ये सेल्फी काढल्याची देखील माहिती मिळत आहे. बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला असून आरोपीने कुरिअर बॉय असल्याचं सांगत सोसायटीत प्रवेश केला.
त्या आरोपीला तरुणीने कुरिअर माझं नाही असं सांगितले, मात्र सही करावी लागेल, असं आरोपीने सांगितल्यानंतर दरवाजा उघडताच त्या आरोपीने तरुणीच्या तोंडावर स्प्रे मारुन तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.