BJP - Shivsena
BJP - Shivsena

BJP - Shivsena : पुण्यात शिवसेना आणि भाजप पक्षाचं अद्याप काही ठरेना; युतीत की स्वबळावर? शेवटपर्यंत सस्पेन्स कायम

महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(BJP - Shivsena ) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यात अद्याप शिवसेना आणि भाजप पक्षाचं काही ठरत नसल्याचे पाहायला मिळत आहे.

शिवसेना आणि भाजप पक्षांमध्ये कुठल्याही हालचाली दिसत नसून अद्यापही शिवसेना-भाजपमध्ये कुठलीही बैठक झाली नाही. कुठल्या प्रभागातून कोण उमेदवार मागे घ्यायचं याबाबत कुठलीही चर्चा नाही.

140 पेक्षा अधिक जागांवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारांना AB फॉर्म दिले आहेत. मात्र अद्याप कुणालाही उमेदवारी मागे घेण्यासाठी संपर्क नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता पुणे पालिकेची निवडणूक दोन्ही पक्ष युतीत लढणार की स्वबळावर? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Summary

  • पुण्यात शिवसेना-भाजप युतीचे नेमकं काय होणार?

  • शिवसेना आणि भाजप पक्षांमध्ये कुठल्याही हालचाली नाहीत

  • अद्यापही शिवसेना-भाजपमध्ये कुठलीही बैठक झाली नाही

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com