Pune
पुणे
Pune : पुण्यातील फुरसुंगीत गांजाची तस्करी; गुन्हे शाखेकडून 22 लाखांचा मुद्देमाल जप्त
पुण्यातील फुरसुंगीत गांजाची तस्करी उघडकीस आली आहे.
(Pune ) पुण्यातील फुरसुंगीत गांजाची तस्करी उघडकीस आली आहे. थार गाडीतून गांजाची तस्करी सुरू असल्याची माहिती समोर आली. याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई करत 26 किलो गांजासह थार गाडी जप्त केली असून, एकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
फुरसुंगी येथील डी मार्ट परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. थार गाडीतून गांजाची तस्करी होणार आहे. त्यानुसार गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ हालचाली करत सापळा रचला.
संशयित गाडी थांबवून त्याची तपासणी करण्यात आल्यानंतर तब्बल 26 किलो गांजा सापडला. त्याची अंदाजे बाजारभावानुसार किंमत 22 लाख रुपये असल्याचे समजते. याप्रकरणीआरोपीस ताब्यात घेऊन अधिक चौकशी सुरू करण्यात आली आहे.