Pune
पुणे
Pune : परीक्षेचा पेपर पुन्हा लिहायला देण्यासाठी 10 ते 15 हजार रुपये, नामांकित कॉलेजमधील गैरप्रकार
(Pune) वाघोली येथील एका नामांकित अभियांत्रिकी कॉलेजमध्ये पेपर फुटीचा प्रकार समोर आला आहे.
(Pune) वाघोली येथील एका नामांकित अभियांत्रिकी कॉलेजमध्ये पेपर फुटीचा प्रकार समोर आला आहे. एक प्राध्यापक परीक्षा झाल्यानंतर रात्री विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यास देत होता. यासाठी विद्यार्थी दहा ते पंधरा हजार रुपये मोजत होते.
परीक्षा झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना कुठल्याही विषयामध्ये पास होण्याची शक्यता वाटत नव्हती. असे विद्यार्थी परीक्षेत प्रश्नाची उत्तरे रिकामे ठेवत होते. त्यानंतर हा प्राध्यापक त्यांना संध्याकाळी तोच पेपर परत लिहिण्यासाठी देत होता.
अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरु होता. याच पार्श्वभूमीवर आता या प्राध्यापकाला गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री कारवाई करत ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून पेपरचे गट्टे देखील जप्त करण्यात आले आहे.