Pune Yavat
पुणे
Pune Yavat : दौंडच्या यवतमध्ये तणावपूर्ण शांतता; पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील यवतमध्ये दोन गटात तणाव निर्माण झाला होता.
(Pune Yavat) पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील यवतमध्ये दोन गटात तणाव निर्माण झाला होता. सोशल मीडियावर एका तरुणाने आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर दोन गट आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे यवतमध्ये तणाव निर्माण झाला होता.
दौंड तालुक्यातील यवत शहरात दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षानंतर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. सध्या यवत शहरात तणावपूर्ण शांतता आहे.पोलिसांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
कालच्या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती मिळत आहे.