Pune Accident
Pune Accident

Pune Accident : पुण्याच्या जुन्या कात्रज घाटात भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू, एकजण जखमी

भिलारेवाडी वळणाजवळ भीषण अपघात
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • पुण्याच्या जुन्या कात्रज घाटात भीषण अपघात

  • भिलारेवाडी वळणाजवळ भीषण अपघात

  • अपघातात दोन जणांचा मृत्यू, एकजण जखमी

(Pune Accident) पुण्याच्या जुन्या कात्रज घाटात भीषण अपघात झाला. भिलारेवाडी वळणाजवळ हा भीषण अपघात झाला असून या अपघातात दोन जणांचा मृत्यू, एकजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी जुन्या कात्रज घाटामध्ये भिलारेवाडी वळणाजवळ पीएमटी बस आणि हिरो होंडा पॅशन मोटरसायकल यांचा हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर पीएमटी बसचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com