Vaishnavi Hagawane Case
Vaishnavi Hagawane Case

Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे प्रकरण, 'त्या' पंख्याचीही होणार फॉरेन्सिक चाचणी

वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यू प्रकरणात नवे वळण आले आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

(Vaishnavi Hagawane Case ) वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यू प्रकरणात नवे वळण आले आहे. वैष्णवी तिच्या घरी पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळली होती. या प्रकरणात तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हुंड्यासाठी छळ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याप्रकरणी तिचा पती शशांक, सासू लता, नणंद करिश्मा, सासरे राजेंद्र आणि दीर सुशील हगवणे हे अटकेत आहेत. पोस्टमार्टम अहवालात वैष्णवीचा मृत्यू संशयास्पद असल्याची माहिती मिळत आहे.

घटनास्थळी वापरलेल्या पंख्याचीही आता फॉरेन्सिक चाचणी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. पंखा 71 किलो वजन पेलू शकतो का, याची तपासणी देखील होणार असल्याची माहिती आहे. या चाचणीद्वारे, पंख्याच्या संरचनेत कोणतेही बदल किंवा पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न झाले आहेत का, हे तपासले जाणार आहे.

राजेंद्र आणि शशांक हगवणे या पितापुत्रासह नीलेश चव्हाणची पोलिस कोठडी संपत असल्याने आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com