Vaishnavi Hagawane case : जालिंदर सुपेकरांना मोठा धक्का; थेट होमगार्ड विभागात बदली
(Vaishnavi Hagawane Case ) पुण्यातील वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात संतापाचं वातावरण पसरले आहे. यातच आता पुण्याचे कारागृह पोलीस महानिरीक्षक आणि शशांक हगवणेचे मामा जालिंदर सुपेकर यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.
कारागृहाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदावरुन त्यांची बदली करण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागाने परित्रक काढून जालिंदर सुपेकर यांची बदली केली आहे. पुण्यातील कारागृह व सुधारसेवा विशेष पोलीस महानिरीक्षक पदावरुन जालिंदर सुपेकर यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे.
जालिंदर सुपेकर यांच्यावरील 3 पदांचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला होता आणि आता त्यांची कारागृहाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदावरुन बदली करण्यात आली असून जालिंदर सुपेकर यांना यांच्यावर हगवणे बंधूना शस्त्र परवाना दिल्याचा आरोप आहे. जालिंदर सुपेकर हे सुशील आणि शशांक हगवणे यांचे मामा आहेत.