Vaishnavi Hagwane Case
Vaishnavi Hagwane Case

Vaishnavi Hagwane Case : वैष्णवीचा सासरा राजेंद्र आणि दीर सुशील हगवणेला अटक; दोघांचं अटकेआधीचं सीसीटीव्ही फुटेज आले समोर

वैष्णवी हगवणे प्रकरणी गेल्या सात दिवसांपासून राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशील हगवणे हे दोघे फरार झाले होते.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Vaishnavi Hagwane Case ) वैष्णवी हगवणे प्रकरणी गेल्या सात दिवसांपासून राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशील हगवणे हे दोघे फरार झाले होते. आज या दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पती, सासू व नणंद यांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र सासरा आणि दीर फरार होते.

अखेर आज, शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास दोघांनाही पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पहाटे साडेचार वाजता बावधन पोलिसांकडून ही अटक करण्यात आली होती. हे दोघेही पुणे जिल्ह्यातून खेडेगावात लपले असल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता अटकेच्या आधीचा सीसीटीव्ही आता समोर आला आहे. एका हॉटेलमधील हा सीसीटीव्ही असल्याची माहिती मिळत असून सीसीटीव्हीमध्ये राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे दोघे तळेगाव मधील एका हॉटेलमध्ये मटणावर ताव मारतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com