Pune
पुणे
Pune : आता कात्रज बायपास मार्गावर वाहन वेग मर्यादा
आता कात्रज बायपास मार्गावर वेग मर्यादा असणार आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pune) आता कात्रज बायपास मार्गावर वेग मर्यादा असणार आहे. त्यामुळे या मार्गावरुन वाहतूक करताना ही वेगमर्यादा पाळावी लागणार आहे. वाहन वेग मर्यादा 40 किमी प्रतितास बंधनकारक असणार आहे.
अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून पुणे शहर वाहतूक विभागाच्या हद्दीतील कात्रज बाह्यवळण मार्गावरील कात्रज नवीन बोगदा ते नवले ब्रिज दरम्यान वाहनांच्या वेगामुळे वारंवार होणाऱ्या अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी रस्त्यावरील वेग मर्यादित करणे आवश्यक असल्याने कात्रज बायपास मार्गावरील भुमकर ब्रिज ते नवले ब्रिज शेवटपर्यंत कमाल वेगमर्यादा 40 किमी प्रतितास करण्यात आली आहे.
Summery
आता कात्रज बायपास मार्गावर वेग मर्यादा
वाहन वेग मर्यादा 40 किमी प्रतितास बंधनकारक
अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्णय
