Pune
पुणे
Pune : पुण्यात पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून जलसंपदा विभाग अलर्टवर; नियंत्रण कक्ष सुरू
पुण्यात पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून जलसंपदा विभाग अलर्टवर आल्याचे पाहायला मिळत आहे.
( Pune )पुण्यात पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून जलसंपदा विभाग अलर्टवर आल्याचे पाहायला मिळत आहे. जलसंपदा विभागाकडून नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. खडकवासला धरणात 70 टक्के पाणी जमा झाल्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिका पूरस्थितीची पूर्व सूचना दिली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
जलसंपदाकडून पूर्ण नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून पूरस्थितीच्या माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी जलसंपदा विभागाने नियंत्रण कक्षात पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकेच्या काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असल्याची माहिती मिळत आहे.
या नियंत्रण कक्षात वायरलेस यंत्रणा बसवण्यात आली असून त्या यंत्रणेचे मॉक ड्रिल घेण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.