Pune
Pune

Pune : पुण्यातील 'या' भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

पुण्यातील येरवडा, टिंगरेनगर भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद ठेवण्यात येणार आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

(Pune) पुण्यातील येरवडा, टिंगरेनगर भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे महापालिका बंडगार्डन पाणीपुरवठा विभागामार्फत स्थापत्य विषयक अत्यावश्यक व तातडीच्या देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याने गुरुवार, 21 ऑगस्ट रोजी पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

महापालिकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, येरवडा, संगमवाडी, टिंगरेनगर, विद्यानगर, वडगावशेरी, खराडी, चंदननगर, सोमनाथनगर, विमाननगर, लोहगाव, विश्रांतवाडी, नागपूरचाळ, येरवडा कारागृह वसाहत, प्रेस कॉलनी, कल्याणीनगर, धानोरी, कलवड, फुलेनगर, साप्रस, शांतीनगर, प्रतिकनगर आणि कस्तुरबा वसाहत या भागांना परिणाम होणार आहे.

दरम्यान, शुक्रवारी (22 ऑगस्ट) उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी या काळात पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com