Pune Election : बंडू आंदेकर कुटुंब जेलमधून निवडणूक लढवणार? कोर्टाने दिला ग्रीन सिग्नल
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
अमोल धर्माधिकारी, पुणे
(Pune Election ) बंडू आंदेकर कुटुंबासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. बंडू आंदेकर कुटुंब पालिका निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळत आहे. बंडू आंदेकर , लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर हे पुणे महापालिका निवडणुक लढवणार असून पुण्यातील विशेष मकोका न्यायालयाने निवडणूक लढविण्यास परवानगी दिली असल्याची माहिती मिळत आहे.
आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकर याच्यासह त्याच पूर्ण कुटुंब न्यायालयीन कोठडीत आहे. पोलीस बंदोबस्तात अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया करू शकता अशी सूचना न्यायालयाने दिली असून बंडू आंदेकर हा कुख्यात गुंड असून त्याची भावजय लक्ष्मी आंदेकर ही माजी नगरसेविका आहे तसेच सोनाली आंदेकर ही माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची पत्नी आहे,
आंदेकर कुटुंब हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासोबत होते मात्र राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर वनराज आंदेकर आणि कुटुंब अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत होते. आता मात्र आंदेकर कुटुंब कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. आंदेकर कुटुंबाने पुणे महापालिका निवडणूक लढण्यासाठी विशेष कोर्टात वकीला मार्फत अर्ज दिला होता. त्यावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना परवानगी दिली आहे.
Summery
बंडू आंदेकर कुटुंब पालिका निवडणूक लढवणार
पुण्यातील विशेष मकोका न्यायालयाने दिली परवानगी
बंडू आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकरनिवडणूक लढवणार
