Mumbai : मुंबईत 'या' विभागांमध्ये आज आणि उद्या 15 टक्के पाणीकपात
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai ) मुंबईत 17 विभागांमध्ये आज आणि उद्या 15 टक्के पाणीकपात करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई शहरमधील ए, सी, डी, जी दक्षिण, जी उत्तर विभागमध्ये पाणीकपात असणार असून भांडुप जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी तानसा जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेण्यात आल्याने ही पाणी कपात करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
यामध्ये पूर्व उपनगरे : एन, एल आणि एस विभाग, पश्चिम उपनगरे : एच पूर्व, एच पश्चिम, के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण, आर उत्तर, आर मध्य विभाग याचा समावेश आहे. या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करुन ठेवावा तसेच पाण्याचा जपून वापर करावे असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
Summery
मुंबईत १७ विभागांमध्ये आज आणि उद्या १५ टक्के पाणीकपात
मुंबई शहरमधील ए, सी, डी, जी दक्षिण, जी उत्तर विभागमध्ये होणार पाणीकपात
नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन
