Breaking News : दहिसर मतदारसंघात कार्यकर्त्यांकडून 2 युवकांना मारहाण
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Breaking News ) दहिसर मतदारसंघात कार्यकर्त्यांकडून 2 युवकांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. दहिसरमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
काल 8 च्या सुमारास ही घटना घडली असून लाथा-बुक्क्यांसह पक्षाच्या झेंड्यांनीही मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवसेनेच्या प्रचार फेरीमध्ये ही मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे.
शिवसेना उमेदवार रेखा राम यादव यांच्या समर्थकांचा व्हिडिओ व्हायरल झाला असून मारहाणीच्या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या व्हिडिओची दखल घेत MHB पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
Summary
दहिसर मतदारसंघात कार्यकर्त्यांकडून 2 युवकांना मारहाण
शिवसेनेच्या प्रचार फेरीमध्ये मारहाण
मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
