Mumbai Water Supply : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! मुंबईत 44 तास पाणीबाणी, 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai Water Supply) मुंबईत 44 तास पाणीबाणी असणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या 'मेट्रो ७अ' प्रकल्पासाठी २,४०० मिमी व्यासाच्या अप्पर वैतरणा जलवाहिनीचा काही भाग वळवण्यात आला आहे.
वळवलेल्या जलवाहिनीला पूर्व विभागाशी जोडण्याचे काम सुरू केले जाणार असून या कामासाठी मुंबईत 44 तास पाणीबाणी असणार आहे. दादर, भांडुप आणि विक्रोळीतील अनेक भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
उद्या सकाळी 9 वाजल्यापासून 22 जानेवारी रोजी सकाळी 5 वाजेपर्यंत दादर, प्रभादेवी, माहीम, धारावी, अंधेरी पूर्व, विक्रोळी, भांडुप, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, कांजूरमार्ग आणि विक्रोळी पश्चिमेकडील अनेक भागात पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. रहिवाशांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे महानगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
Summary
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा!
मेट्रोच्या कामामुळे मुंबईत 44 तास पाणीबाणी
दादर, भांडुप आणि विक्रोळीतील अनेक भागात पाणीपुरवठा बंद
