Mumbai : मुंबई हायकोर्टाबाहेर एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतलं
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai) मुंबई हायकोर्टाबाहेर एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाबाहेर एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी आणि रस्त्याने जाणाऱ्यांनी तात्काळ आग विझवली आणि प्रकाश सावंत नावाच्या व्यक्तीला, जो ५०% भाजला होता त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रकाश सावंत यांचा एका वकिलाशी खटला दाखल करण्यावरून वाद झाला असल्याची माहिती मिळत असून त्यामुळे या प्रकाश सावंत यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
Summery
मुंबई हायकोर्टाबाहेर एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतलं
स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न
पोलिसांनी, रस्त्याने जाणाऱ्यांनी तात्काळ आग विझवली
