Dombivli
मुंबई
Dombivli : डोंबिवलीतील एम्स हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरुन तरुणानं मारली उडी
डोंबिवलीतील एम्स हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरुन तरुणानं उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
(Dombivli) डोंबिवलीतील एम्स हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरुन तरुणानं उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. रोहित कटके असे या उडी मारणार तरुणाचे नाव असल्याची माहिती मिळत आहे.
या तरुणाची आई एम्स रुग्णालयात उपचार घेत आहे. चौथ्या माळ्यावर खूप वेळ रोहित उभा राहून खाली उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळत आहे. त्याला अनेकदा विनवण्या देखील केल्या मात्र त्याने उडी मारली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल त्या ठिकाणी पोहोचले, मात्र रोहितने उडी मारली. या घटनेत रोहितला मोठी दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा पोलीस तपास करत आहेत.