Aaditya Thackeray - Amit Thackeray
Aaditya Thackeray - Amit Thackeray

Aaditya Thackeray - Amit Thackeray : आदित्य-अमित ठाकरेंची आज एकत्र प्रचार रॅली: 'या' भागात करणार एकत्र प्रचार

महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. सभांचा धडाका सुरू असल्याचे पाहायला मिळत असून मुलाखती घेतल्या जात आहेत.

यातच आता महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. आज संध्याकाळी 5.30 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार असून 15 तारखेला मतदान आणि 16 तारखेला मतमोजणी होणार आहे. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंची एकत्र प्रचार रॅली होणार आहे. भायखळा, माहीम, वरळी , शिवडी या परिसरात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंची एकत्र प्रचार रॅली निघणार आहे. या रॅली दरम्यान आदित्य - अमित ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Summary

  • निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

  • आदित्य-अमित ठाकरेंची आज एकत्र प्रचार रॅली

  • भायखळा, माहीम, वरळी, शिवडी परिसरात करणार एकत्र प्रचार

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com