Mumbai Air Pollution : मुंबईतील हवेचा दर्जा घसरला; हवा प्रदूषणाबाबत आज हायकोर्टात तातडीची सुनावणी
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai Air Pollution ) मुंबईतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून वायुप्रदूषणाचे प्रमाणही झपाट्याने वाढताना पाहायला मिळत आहे.थंडीची चाहूल लागली असतानाच त्यासोबत मुंबईमध्ये प्रदूषणात झपाट्याने वाढ होत आहे.
मागच्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत असून यामुळे अनेक आजार बळावण्याची शक्यता आहे. मुंबईतील हवेची पातळी अत्यंत खालावली असल्याचे पाहायला मिळत असून या वातावरणामुळे अनेक भागातील नागरिक खोकला, सर्दीने त्रस्त झाले आहेत. मागील दोन दिवस मुंबईच्या हवेचा दर्जा आणखी घसरला आहे.
याच पार्श्वभूमीवर आता हवा प्रदूषणाबाबत आज हायकोर्टात तातडीची सुनावणी पार पडणार आहे. मुंबईतील हवेचा दर्जा घसरला असून यावर आता सुनावणी पार पडणार असून या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Summery
मुंबईतील हवेचा दर्जा घसरला
हवा प्रदूषणाबाबत आज हायकोर्टात तातडीची सुनावणी
वातावरणातील धुळ आणि धुरामुळे दृश्यमानता कमी
