Mumbai Pollution : प्रदूषणाचा प्रश्न अत्यंत गंभीर; निर्देशांक चिंताजनक पातळीवर
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Mumbai Pollution ) मुंबईतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून वायुप्रदूषणाचे प्रमाणही झपाट्याने वाढताना पाहायला मिळत आहे.
थंडी असतानाच त्यासोबत मुंबईमध्ये प्रदूषणात झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत असून यामुळे अनेक आजार बळावण्याची शक्यता आहे. मुंबईत वाढत्या धुके, धूळ आणि वाहनांच्या धुरामुळे प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे.
अनेक ठिकाणी हवेची गुणवत्ता अतिशय वाईट पातळीवर पोहोचल्याचे पाहायला मिळाले. रविवारी प्रदूषणाच्या पातळीत मोठी वाढ झाली असून दु संपूर्ण शहराचा एक्यूआय 356 अंकांवर पोहचल्याची माहिती मिळत आहे. शहराच्या अनेक भागांत हवेची गुणवत्ता खराब श्रेणीत होती. मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न चिंतेचा विषय बनला. आजारांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे.
Summary
मुंबईतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब
प्रदूषणाचा प्रश्न अत्यंत गंभीर
निर्देशांक चिंताजनक पातळीवर
