Mumbai : मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दुबार मतदार शोधण्यासाठी मोठी हालचाल; राज्य निवडणूक आयोगाचे मुंबई महापालिका आयुक्तांना थेट निर्देश
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai) महापालिका निवडणुकांसाठी आता सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले असून अनेक बैठकांचे आयोजन करण्यात येते. यातच याच पार्श्वभूमीवर आता 'संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा' असा राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांबाबत आदेश देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
दुबार मतदारांना शोधून ते कोणत्या मतदार संघात मतदान करणार याबाबत विहित नमुन्यात अर्ज भरून घेतला जाणार असल्याची माहिती मिळत असून यातच आता मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दुबार मतदार शोधण्यासाठी मोठी हालचाल सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून मुंबई महापालिका आयुक्तांना थेट निर्देश देण्यात आले आहेत. एकूण 227 प्रभागांसाठी 227 स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करा असे सांगण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांवर दुबार मतदारांची तपासणी करण्याची जबाबदारी सोपवा, मतदान यादीतील चुका व त्रुटी शोधून दूर करा, असे राज्य निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता मतदार यादीतील गोंधळ संपणार का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summery
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दुबार मतदार शोधण्यासाठी मोठी हालचाल
राज्य निवडणूक आयोगाचे मुंबई महापालिका आयुक्तांना थेट निर्देश
एकूण २२७ प्रभागांसाठी २२७ स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करा
