Borivali
Borivali

Borivali : भाजपाचे गणेश खणकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे सुबोध माने भिडले; वादाचं नेमकं कारण अस्पष्ट; दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोप सुरू

आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Borivali ) आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. मात्र या दरम्यान अनेक वाद देखील होताना पाहायला मिळत आहेत. यातच आता बोरिवली पूर्वेत वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे.

भाजपचे गणेश खणकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे सुबोध यांच्यात हा वाद झाला असून गणेश खणकर यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुबोध मानेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आधी खणकारांनी महिलेवर हात उचलला होता असा आरोप करण्यात आला.

या दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुबोध मानेंचे समर्थक आक्रमक झाले. रात्रभर दहिसर पोलीस स्टेशनमध्ये माने यांचे समर्थक बसून होते. मात्र हा वाद नेमका कसा झाला आणि या वादाचं नेमकं कारण अस्पष्ट आहे. दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

Summery

  • भाजपचे गणेश खणकर आणि सुबोध माने भिडले

  • गणेश खणकर यांना मारहाण झाल्याचा आरोप

  • ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुबोध मानेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com