Mumbai Airport : Taj Hotel
Mumbai Airport : Taj Hotel

Mumbai Airport : Taj Hotel : मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Mumbai Airport, Taj Hotel ) मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुंबई विमानतळ पोलिसांच्या ईमेल आयडीवर ही धमकी आली आहे.

या ईमेलमध्ये ताज हॉटेल आणि मुंबई विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. याच्यााधीही मुंबई विमानतळ हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती.

मुंबईत पोलिसांनी याची तात्काळ दखल घेत तपासाला सुरुवात केली आहे. एका अज्ञात व्यक्तीने मुंबई विमानतळ पोलिसांना ईमेल केला असून संसदेवरील हल्ल्याप्रकरणी फाशी देण्यात आलेला दहशतवादी अफजल गुरुला आणि सावक्कू शंकर यांचे नाव ईमेलमध्ये नमूद केले असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com