Air pollution : मुंबई महापालिका क्षेत्रातील 53 निर्माणाधीन इमारतीच्या बिल्डरांना काम थांबवण्याचे आदेश
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Air pollution) वायु प्रदूषणाचा इमारत बांधकामांना फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. प्रदूषणाचे प्रमाण वाढत झाले आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून याच पार्श्वभूमीवर आता मुंबई महापालिका क्षेत्रातील 53 निर्माणाधीन इमारतीच्या बिल्डरांना काम थांबवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
15 ऑक्टोबर 2025 रोजी वायू प्रदूषण नियंत्रणासाठी 28 मुद्द्यांची समावेश असलेली मार्गदर्शन तत्वे जाहीर केली. वरळी प्रभादेवी आणि सिद्धार्थ नगर परिसरात 17 बांधकामे, भायखळा माजगाव परिसरातील 5 बांधकामे यासोबतच मालाड पश्चिम परिसरातील 31 बांधकामे बंद करण्याचे पालिकेने आदेश दिले आहेत.
Summery
वायु प्रदूषणाचा इमारत बांधकामांना फटका
मुंबईतील 53 बांधकामांना कामे थांबवा नोटीस
या इमारती वायू प्रदूषणास कारणीभूत असल्याचा ठेवला ठपका
