Building Collapse
मुंबई
Building Collapse : वांद्रे पूर्वेमधील तीन मजली इमारत कोसळली; सात जण जखमी
वांद्रे पूर्वेमधील तीन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे.
(Building Collapse) वांद्रे पूर्वेमधील तीन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत सात जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल दाखल झाले आहे. इमारतीचा दुसरा आणि तिसरा मजला कोसळल्याची माहिती मिळत असून ढिगाऱ्याखाली 8-10 लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बीएमसी अधिकाऱ्यांच्या मते, 2 एडीएफओ, 5 एसआरएसओ, 1 एसओ, 5 अग्निशमन इंजिन, एमडब्ल्यूटी, सीएफएफ, एफटी, आरव्ही, डब्ल्यूक्यूआरव्ही आणि 108 रुग्णवाहिका सेवांसह प्रमुख अग्निशमन आणि बचाव कर्मचारी घटनास्थळी आहेत. बचाव कार्य सुरू असल्याची माहिती मिळत आहे.