Mumbai Costal Road Accident
मुंबई
Mumbai Costal Road Accident : मुंबई कोस्टल रोड अपघात; भरधाव कार पलटली, Video
मुंबईच्या कोस्टल रोडवर भरधाव कारचा अपघात झाला.
(Mumbai Costal Road Accident ) मुंबईच्या कोस्टल रोडवर भरधाव कारचा अपघात झाला. मुंबईतील कोस्टल रोडमध्ये दक्षिण दिशेच्या बोगद्यात कार पलटून हा अपघात झाला. संध्याकाळी 7.30 वाजता कोस्टल रोड भुयारी मार्ग येथे पाऊस असल्यामुळे गाडी स्किड होऊन पलटली.
रस्त्याच्या मधोमध ही गाडी पलटल्याने वाहतूक कोंडी झाली. गाडीच्या दोन्ही एअर बॅग ओपन झाल्या होत्या आणि चालकाने सीट बेल्ट लावलेला असल्यामुळे दुखापत टळली.
तसेच मुंबई सेंट्रल आरटीओ कार्यालयाच्या टॅक्सी मदत पथकाचे अपघातस्थळावरुन जात असताना त्यांनी कोस्टल रोडवरील आपत्कालीन लँडलाइन फोनचा वापर करून तात्काळ कंट्रोल रूमला फोन लावला आणि ॲम्बुलन्स आणि टोइंग व्हॅन मागवल्याची माहिती मिळत आहे.