Central Railway
मुंबई
Central Railway : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; बदलापूर वांगणीजवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड
बदलापूर वांगणी जवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड
थोडक्यात
- बदलापूर वांगणी जवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड 
- मुंबईकडे जाणाऱ्या लोकलवर परिणाम 
- दरम्यान प्रवाशांचे प्रचंड हाल होतायेत 
(Central Railway) मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून बदलापूर वांगणीजवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या लोकलवर परिणाम झाला असून कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे यामुळे हाल झालेलं पाहायला मिळत आहे.
मालगाडीच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.बिघाड झालेल्या इंजिनची दुरुस्ती करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे. लोकलच्या वाहतुकीवर थेट परिणाम झाला असून अनेक ठिकाणी नागरिक ट्रॅकवर उतरुन चालत जात आहेत. 
वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. लोकलसेवा ठप्प झाली असून, प्रवाशांना कामावर पोहोचायला उशीर होत आहे.

