Mumbai
Mumbai

Mumbai : मुंबई विमानतळावर ओरिओ बिस्कीट आणि चॉकलेटमधून कोकेनची तस्करी

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कोकेनचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

(Mumbai ) मुंबई विमानतळावरून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबईत ड्रग्जचा मोठा साठा सापडला असून मुंबई एअरपोर्टवर कोकेन बिस्किट आणि चॉकलेटमध्ये लपवून आणले जात असल्याची माहिती महसूल गुप्तवार्ता विभागाला मिळाली . याप्रकरणात एका संशयित महिलेला अटक करण्यात आली आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कोकेनचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे महसूल गुप्तवार्ता विभागाने ही कारवाई केली आहे. ओरिओ बिस्कीट आणि चॉकलेटमधून या कोकेनची तस्करी करण्यात आली होती. या संदर्भात एका महिलेला अटक करण्यात आली आहे.

या महिला प्रवासीकडून तब्बल 6 किलो 200 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. याची किंमत सुमारे 62 कोटी रुपये असल्याची माहिती मिळत आहे. महिलेच्या सामानाची तपासणी केल्यावर तिच्याकडे तीन चॉकलेटचे बॉक्स सापडले. त्यामध्ये तब्बल कोकेनने भरलेल्या 300 कॅप्सुल सापडल्या. याप्रकरणी संबंधित महिलेला अटक करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com