Garbage
मुंबई
Garbage : कचरा उचलण्यात कंत्राटदारांची दिरंगाई; भायखळ्यातील दोन रुग्णालय आणि शाळेजवळील कचऱ्याचा ढिगाऱ्यामुळे दुर्गंधी
मुंबई आणि उपनगरातील कचरा उचलण्यात कंत्राटदार दिरंगाई करत असल्याचे वारंवार लोकशाहीच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Mumbai Garbage Scam ) मुंबई आणि उपनगरातील कचरा उचलण्यात कंत्राटदार दिरंगाई करत असल्याचे वारंवार लोकशाहीच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे. भायखळ्यातील दोन रुग्णालय आणि शाळा हाकेच्या अंतरावर असलेल्या कचऱ्याचा ढिगाऱ्यामुळे मोठी दुर्गंधी पसरत असते.
यामुळे सकाळी लवकर कचरा उचलला जातो पण कधी कधी हा कचरा उचलला जात नाही. कचरा उचलण्याचा गाड्या देखील मोडकळीस आल्या असल्या तरी त्याच वापराव्या लागतात असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. मात्र नागरिकांचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत लोकशाहीच्या माध्यमातून कचऱ्याचा प्रश्न उचलून धरणार आहे.
Summery
कचरा उचलण्यात कंत्राटदारांची दिरंगाई
कचरा उचलणाऱ्या गाड्यांची दूरावस्था
कचरा उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात
