Crime News : संतापजनक! आईच्या प्रियकराकडून अडीच वर्षाच्या चिमुकलीवर लैगिंक अत्याचार
प्रेयसी आईसमोरच प्रियकराने तिच्या अडीच वर्षाच्या मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याचा संतापजनक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अत्याचारादरम्यान या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रेयसी आई आणि प्रियकराला ताब्यात घेतले असून त्याच्यावर पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे स्थानिक रहिवांशामध्ये संतापची लाट उसळली आहे.
नेमकं काय झालं?
30 वर्षीय आरोपी आई ही मालाडच्या मालवणी येथे राहणारी आहे. तीन वर्षापूर्वी तिचा पती तिला सोडून गेला, त्यावेळेस ती महिला गरोदर होती. त्यानंतर महिलेने एका मुलीला जन्म दिला होता. आता ती मुलगी सध्या वर्षाची आहे. पतीसोडून गेल्यावर आरोपी आई एका 19 वर्षीय तरुणाबरोबर प्रेमसंबधात अडकली. रविवारी रात्री आरोपी प्रियकर तिच्या घरी आला होता. यावेळी त्याने महिलेशी शारीरित संबंध ठेवले होते. त्यानंतर 19 वर्षीय तरुणाने आरोपी आईच्यासमोर तिच्या अडीच वर्षाच्या मुलीवर लैगिंक अत्याचार केला. त्यात पीडित चिमुकलीला प्रचंड वेदना होत होत्या. चिमुकली वेदनांनी विवळत होती. त्यामध्येच चिमुकलीचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर आरोपी आई आपल्या मुलीला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेली. तेथील डॉक्टरांना मुलगी आजारी असल्याचे सांगून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिशाभूल करु लागली. परंतू मृत मुलीच्या गुप्त भागावर जखमा दिसून आल्याने डॉक्टरांना महिलेवर संशय आला. काही चाचण्या केल्यानंतर सदर प्रकरण उडकीस आले. त्यानंतर आरोपी महिलेला आणि तिच्या 19 वर्षीय प्रियकराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून दोघांनाही ताब्यात घेतले आहे. याच गुन्ह्यात ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत.