Mumbai Dabbawala : दिवाळीनिमित्त डबेवाल्यांची सेवा पाच दिवसांसाठी बंद
थोडक्यात
दिवाळीनिमित्त डबेवाल्यांची सेवा 5 दिवसांसाठी बंद
20 ऑक्टोबरपासून डबेवाले 5 दिवस रजेवर जाणार
5 दिवसाचा पगार कापू नये, डबेवाल्यांची मागणी
(Mumbai Dabbawala) मुंबईतील वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये काम करणारे कर्मचाऱ्यांना रोज दुपारचा जेवणाचा डबा पोहोचवण्याचे काम मुंबईचे डबेवाले करत असतात. हे मुंबईचे डबेवाले ठिकठिकाणच्या कार्यालयांमध्ये वेळेवर जेवणाचे डबे पुरवित असतात.
यातच आजपासून दिवाळीला सुरुवात झाली आहे. याच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर डबेवाले 5 दिवसांच्या रजेवर जाणार आहेत. 20 ऑक्टोबरपासून पुढील पाच दिवस डबेवाले सुट्टीवर असणार आहेत. विशेष म्हणजे पंढरपूर वारी, गावची जत्रा, अधूनमधून मोजक्याच समान सुट्ट्या हे डबेवाले घेत असतात.
बहुतांशी डबेवाल्यांनी दिवाळीनिमित्त घरी जाण्याचा बेत आखला असून यावर्षी पहिल्यांदाच दिवाळीनिमित्त पाच दिवस सुट्टी घेतली आहे. दरम्यान पाच दिवसाचा पगार कापू नये आणि बोनस द्यावा अशी मागणीही डबेवाल्यांनी केली आहे.