Dadar Kabutar khana : दादरच्या कबुतरखान्याचा वाद हायकोर्टात, आज सुनावणी
(Dadar Kabutar khana) मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर मुंबई महानगर पालिकेकडून कारवाई करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर जैन समाज चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
काल सकाळी मुंबईच्या दादर येथील कबुतरखान्यावर जैन समाजाचे मोठ्या संख्येने आंदोलक जमले आणि कबुतरखान्यावर जी ताडपत्री टाकण्यात आलेली होती ती फाडून टाकली. तसेच कबुतरांसाठी आणलेलं खाणं देखील त्यांनी त्या कबुतरखान्यात टाकलं. याच पार्श्वभूमीवर हा वाद आता हायकोर्टात गेला असून आज यावर पहिली सुनावणी पार पडणार आहे.
मुंबई महापालिकेनं कबुतरांना खायला घालण्यास बंदी घातल्यानं त्यांचा मृत्यू होतोय. त्यामुळे त्यांना खाद्यं घालण्यापासून रोखू नका, दिवसातून दोनदा त्यांना खायला घालण्याची परवानगी द्या' अशी मागणी करत पल्लवी पाटील यांच्यासह काही पक्षीप्रेमींनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.