Mumbai Monorail
Mumbai Monorail

Mumbai Monorail : मुंबईची मोनोरेल काही काळ राहणार बंद; तांत्रिक बिघाडावर तोडगा काढण्यासाठी निर्णय

मोनोरेलच्या सेवेत वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्यामुळे निर्णय
Published by :
Team Lokshahi
Published on

थोडक्यात

मुंबईची मोनोरेल काही काळ राहणार बंद

तांत्रिक बिघाडावर तोडगा काढण्यासाठी निर्णय

मोनोरेलच्या सेवेत वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्यामुळे निर्णय

(Mumbai Monorail) मुंबई मोनोरेलच्या सेवेत वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्यामुळे अखेर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) ही सेवा काही काळासाठी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

मोनोरेलमध्ये अनेकवेळा तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. 19 ऑगस्ट रोजी झालेल्या पावसात म्हैसूर कॉलनीजवळ शेकडो प्रवासी अडकून पडले होते. त्याच दिवशी आचार्य अत्रे नगर स्थानकाजवळ आणखी एका गाडीत 200 प्रवासी अडकल्याचा प्रसंग घडला. वडाळा ते सात रस्ता या मार्गावर धावणारी मोनोरेल सध्या प्रवाशांसाठी एकमेव पर्याय होती.

मात्र अलीकडेच 15 सप्टेंबर रोजी एण्टॉप हिल आणि जीटीबीएन स्थानकादरम्यान गाडी अडकली होती, त्यावेळी 17 प्रवाशांना रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आले.त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सेवा थांबवून मोठ्या प्रमाणावर देखभाल आणि सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या काळात मोनोरेल मार्गावर नवे तंत्रज्ञान बसवले जाणार असून CBTC सिग्नलिंग प्रणालीचा समावेश होणार आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, ट्रेन डिटेक्शन सिस्टीम आणि इतर अत्याधुनिक यंत्रणांची चाचणी सुरू आहे. या कामांमुळे भविष्यात प्रवाशांची सुरक्षितता वाढेल आणि सेवा अधिक विश्वासार्ह होईल, असा एमएमआरडीएचा दावा आहे.

याशिवाय ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत मेधा कंपनी आणि SMH Rail यांच्या सहकार्याने 10 नव्या गाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 8 गाड्या आधीच दाखल झाल्या असून उर्वरित दोन गाड्यांची निर्मिती व तपासणी अंतिम टप्प्यात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com