Mukteshwar Mahadev Temple : Malvani : मुक्तेश्वर महादेव मंदिरातील नंदीच्या मूर्तीची विटंबना; मालवणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद
थोडक्यात
मुक्तेश्वर महादेव मंदिरातील नंदीच्या मूर्तीची विटंबना
मालवणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद
मंदिरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
(Mukteshwar Mahadev Temple) मुक्तेश्वर महादेव मंदिरातील नंदीच्या मूर्तीची विटंबना केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मालवणीच्या अक्सा गावातील मुक्तेश्वर महादेव मंदिरातील नंदी मूर्तीची एका अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणे नुकसान केल्याची घटना समोर आली आहे.
घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक तेथे जमले होते. नागरिकांनी आरोपीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.
अज्ञात आरोपीचा शोध आणि पुढील चौकशी मालवणी पोलिसांकडून सुरू आहे. यासंदर्भात लोकशाही मराठीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि विभागातील पोलीस उपायुक्तांशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी माध्यमांशी बोलण्यास त्यांनी नकार दिला.
