Diwali Pahat Dombivli : दिवाळी पहाट जल्लोषात! फडके रोडवर हजारो डोंबिवलीकर एकत्र
थोडक्यात
डोंबिवलीच्या फडके रोडवर दिवाळी पहाट मोठ्या उत्साहात साजरी
सामाजिक संस्था, राजकीय पक्षांकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
अनेक मंडळ तसेच संस्थाकडून भव्य दिव्य रांगोळ्या
(Diwali Pahat Dombivli) दिवाळीला सुरूवात झाली आहे. अनेक ठिकाणी दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर डोंबिवलीच्या फडके रोडवर दिवाळी पहाट मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असून डोंबिवलीचे ग्रामदैवत गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन डोंबिवलीकर फडके रोडवर दिवाळी पहाट निमित्त एकमेकांना शुभेच्छा देतात.
सामाजिक संस्था, राजकीय पक्षांकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. अनेक मंडळ तसेच संस्थाकडून भव्य दिव्य रांगोळ्या काढल्या जातात. डोंबिवलीत फडके रोडवर 'दिवाळी पहाट' मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात तरुण तरुणांची गर्दी डोंबिवली फडके रोडवर पाहायला मिळते.
सगळीजण उत्साहाने एकत्र येत दिवाळीनिमित्त एकमेकांना शुभेच्छा देत असतात. दिवाळी पहाट कार्यक्रमानिमित्त काही संस्था फडके रस्त्यावर डीजे लावून कार्यक्रम सादर करतात.आज देखील दिवाळीच्या निमित्ताने डोंबिवलीमध्ये पहाटे फडके रोडवर हजारो तरुण-तरुणी आलेत, फडके रोड तरुणाई ने फुलून गेलाय, सेल्फी पॉईंट वर फोटो काढताना दिसत आहेत, एकमेकांना शुभेच्छा देत आहेत.