BDD Chawl Redevelopment
मुंबई
Eknath Shinde - Aaditya Thackeray : एकनाथ शिंदे - आदित्य ठाकरे आज एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता; कारण काय?
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील फेज वनचे काम पूर्ण झालं असून 556 लाभार्थ्यांना घरांच्या चाव्यांचे वाटप केले जाणार आहे.
(Eknath Shinde - Aaditya Thackeray) वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील फेज वनचे काम पूर्ण झालं असून 556 लाभार्थ्यांना घरांच्या चाव्यांचे वाटप केले जाणार आहे.
या वरळीतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील फेज वन मधील पूर्ण झालेल्या घरांच्या चाव्या वाटपाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यशवंत नाट्य मंदिर माटुंगा येथे म्हाडाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.त्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.