Thane Eknath Shinde : ठाण्यात एकनाथ शिंदेंचा आज रोड शो
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Thane Eknath Shinde) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे.
मुंबई पालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून याच पार्श्वभूमीवर ठाण्यात एकनाथ शिंदेंचा आज रोड शो होणार आहे. संध्याकाळी 5 वाजल्यापासून रोड शोला सुरुवात होणार असून प्रामुख्याने ठाणे हा शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातो आणि अशातच आपल्या बालेकिल्ल्यात एकनाथ शिंदे रस्त्यावर उतरून प्रचार करणार आहेत.
रोड शोमध्ये खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रविंद्र फाटक, मिनाक्षी शिंदे आणि शिवसेना पक्षाचे इतर मुख्य नेते देखील उपस्थित राहणार आहेत.
Summary
महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले
ठाण्यात एकनाथ शिंदेंचा आज रोड शो
संध्याकाळी ५ वाजल्यापासून रोड शोला होणार सुरूवात
