Elphinstone Bridge
Elphinstone Bridge

Elphinstone Bridge : आज रात्री 12 वाजल्यापासून एल्फिन्स्टन पूल राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणता?

नवीन एल्फिन्स्टन उड्डाणपूल आणि शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर उड्डाणपूल बांधणार
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

आज रात्री 12 वाजल्यापासून एल्फिन्स्टन पूल पूर्णपणे बंद राहणार

नवीन एल्फिन्स्टन उड्डाणपूल आणि शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर उड्डाणपूल बांधणार

वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग लागू

(Elphinstone Bridge) एल्फिन्स्टन पुल पाडण्यास स्थानिकांनी तीव्र विरोध केल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता आज रात्री 12 वाजल्यापासून एल्फिन्स्टन पूल बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. एल्फिन्स्टन पूल पाडून त्या जागी नवीन एल्फिन्स्टन उड्डाणपूल आणि शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज, रात्री 11:59 वाजल्यापासून हा पूल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. यासाठी नवीन वाहतूक नियम लागू करण्यात आले आहे.

वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग

पूर्वेकडून पश्चिमेकडे (East → West):

दादर ईस्ट → दादर वेस्ट : टिळक ब्रिज

परळ ईस्ट → प्रभादेवी / लोअर परळ : करीरोड रोड ब्रिज (07.00 – 15.00)

परळ / भायखळा ईस्ट → प्रभादेवी / वरळी / सी लिंक : चिंचपोकळी ब्रिज

पश्चिमेकडून पूर्वेकडे (West → East):

दादर वेस्ट → दादर ईस्ट : टिळक ब्रिज

प्रभादेवी / लोअर परळ → परळ / KEM / टाटा हॉस्पिटल : करीरोड रोड ब्रिज (15.00 – 23.00)

सी लिंक / वरळी / प्रभादेवी → परळ / भायखळा ईस्ट : चिंचपोकळी ब्रिज

करीरोड रोड ब्रिज (महादेव पालव रोड) वाहतूक वेळापत्रक

07.00 – 15.00 : भारत माता जंक्शन → शिंगटे मास्टर चौक (एकमार्गी)

15.00 – 23.00 : शिंगटे मास्टर चौक → भारत माता जंक्शन (एकमार्गी)

23.00 – 07.00 : दोन्ही बाजू खुली

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com