Mumbai : मुंबईमध्ये आज भाजप, शिवसेना, रिपाईची पहिली जाहीर सभा, कोणावर साधणार निशाणा?
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे.
प्रचाराला जोरदार सुरूवात झाली असून सभांचा धडाका पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईमध्ये महायुतीची पहिली जाहीर सभा पार पडणार आहे. दादर शिवाजी पार्क येथे सभेचं आयोजन करण्यात आले असून सभा मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची आहे.
महायुती भाजप, शिवसेना, रिपाई (आठवले गटाची) ही पहिली जाहीर सभा शिवाजी पार्क दादरला संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. या सभेतून कोणावर निशाणा साधला जातो हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summary
मुंबईमध्ये आज महायुतीची पहिली जाहीर सभा
दादर शिवाजी पार्क येथे सभेचं आयोजन
सभा मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची
